राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान; महाराष्ट्राच्या सीमेवरही घोंगावतयं 'डिप्थीरिया'चं वादळ 

राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात डिप्थीरिया रोगाचं थैमान; महाराष्ट्राच्या सीमेवरही घोंगावतयं 'डिप्थीरिया'चं वादळ 

राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश पुरतं हादरलंय. कारण इथं डिप्थीरिया नावाच्या आजारानं थैमान घातलंय. या आजारामुळे आतापर्यंत 20 बालकांचा मृत्यू झालाय. सप्टेंबरमध्ये या आजाराची लागण झालेल्या बालकांची संख्या 157 वर पोहोचलीय.

या आजारावरच्या उपचारासाठी देण्यात येणारं अँटिडॉट सीरमही उपयोगी ठरत नाहीयेत. त्यामुळे पालकवर्गाची चिंतेत सापडलाय. आता तर  डिप्थीरिया रोगाचं वादळ महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन धडकलंय. 

रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. घश्यामध्ये सूज येते. रूग्णाला हुडहुडी भरते शिवाय तापही येतो. घश्यात खवखव होणं आणि खोकला येणं ही देखील या आजाराची लक्षणं आहेत.

डिप्थीरियाचे विषाणू दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये ऍक्टिव्ह होतात. या आजाराची लक्षणं आढळलेल्या 15 ते 20 टक्के रूग्णांचा मृत्यू होतो. लहान मुलांना या आजाराची लागण सर्वात आधी होते. डिप्थीरिया हा संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष करू नका. एक छोटीसी चुकही जिवघेणी ठरू शकते.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com