Delhi Eelctions: अरविंद केजरीवालांना पावला 'हनुमान'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली Delhi Eelction 2020 : दिल्लीची निवडणूक सुरुवातीला एकतर्फी वाटत होती. नागरिकांमधून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत होता. पण, हळूहळू या निवडणुकीला रंग चढत गेला. हा सामना केजरीवाल विरुद्ध भाजप असाच होता. त्यात केजरीवाल यांच्या हनुमान भक्तीची निवडणुकीत जोरदार चर्चा झाली. भाजपने केजरीवाल यांच्यावर टेररिस्ट अशी टीका केली होती. तर, त्यांच्या हनुमान भक्तीला नाटक म्हटले होते. पण, तोच हनुमान अरविंद केजरीवाल यांना पावल्याचं दिसत आहे. 

कुठून आले हनुमान?
निवडणूक प्रचारा काळात अरविंद केजरीवाल यांनी टीव्ही चॅनेल्सला अनेक मुलाखती दिल्या. या मुलाखतींमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. पण, एका मुलाखतीत अँकरने त्यांना हनुमान चालिसाँ माहिती आहे का? असा प्रश्न केला. त्यावर केजरीवाल यांनी होय असं उत्तर दिलं आणि अँकरने ऐकवाल का? असं विचारल्यानंतर केजरीवाल यांनी संपूर्ण हनुमान चालिसाँ म्हटली. भाजपनं त्यावरून केजरीवाल यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. एका बाजूला शाहीनबागमधील आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला हनुमान चालिसाँ, असं रूप या विधानसभा निवडणुकीला मिळालं. सोशल मीडियावर केजरीवाल यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. तुम्हाला तुमच्या कामांवर विश्वास असेल तर हनुमान चालिसाँचं ढोंग कशाला?, असा प्रश्न अनेकांनी विचारला. 

मतदानाच्या आदल्या दिवशी हनुमान
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदानाच्या आदल्यादिवशीच म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन केले. त्याचे एक ट्विटर त्यांनी शेअर केले. त्यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. 

CP के प्राचीन हनुमान मंदिर जाकर हनुमान जी का आशीर्वाद लिया। देश और दिल्ली की तरक़्क़ी के लिए प्रार्थना की। भगवान जी ने कहा - “अच्छा काम कर रहे हो। इसी तरह लोगों की सेवा करते रहो। फल मुझ पर छोड़ दो। सब अच्छा होगा।”

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 7, 2020

केजरीवालांची कन्या चर्चेत
शाहीन बाग आंदोलना कपिल बैंसला या तरुणानं गोळीबार केला होता. त्याचे आम आदमी पार्टीशी कथित संबंध असल्यामुळं त्यावरून भाजपनं केजरीवाल यांना दहशतवादी असं म्हणायला सुरुवात केली. त्याच दरम्यान, हनुमान चालिसाँ आणि केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिचं वक्तव्य चर्चेत आलं. माझ्या वडिलांनी मला गीत शिकवली, आता हा दहशतवाद आहे का? असा प्रश्न हर्षितानं केजरीवालांवरील टीका करांना विचारला. हर्षिताने या वर्षी विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केलं. या निवडणुकीत ती पहिल्यांदाच प्रकाशझोतात आली होती.

Web Title Delhi Election 2020 Arvind Kejariwal Hanuman Bhakti

संबंधित बातम्या

Saam TV Live