एक घर आणि 11 मृतदेह; तपासात उघडकीस आली धक्कादायक माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 जुलै 2018

राजधानी दिल्लीतील रविवारी सापडलेल्या 11 मृतदेहांच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. बुरारीमधील एकाच कुटुंबातील 11 जणांनी अंधश्रद्धेपायी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी घरातील कागदपत्रांचा तपास केला असता, घटनेवर प्रकाश पडला. पोलिसांना या घरात दोन रजिस्टर आढळून आले आहेत. यामध्ये अलौकिक शक्ती, मोक्षप्राप्तीसाठी मृत्यू हाच एकमेव मार्ग, आत्मा आणि अध्यात्म यांचा परस्परांशी असलेला संबंध अशा स्वरुपाचा मजकूर आढळून आला आहे.

या रजिस्टरमधील शेवटची नोंद ही 26 जूनला झाली आहे. 'आपण 30 जूनला देवाला भेटणार आहोत. देवाच्या भेटीसाठी आपण सर्व हात, पाय, तोंड पूर्णपणे बांधू,' असा मजकूर रजिस्टरमध्ये आहे. 

कोणत्या व्यक्तीनं कुठे लटकायला हवं, याचा तपशीलही रजिस्टरमध्ये आहे. घरात आढळलेले मृतदेह अगदी रजिस्टरमध्ये केलेल्या नोंदीनुसार लटकलेल्या अवस्थेत सापडल्यानं पोलिसही आश्चर्य व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live