दिल्ली पोलिसांकडून तिरंग्यात गुंडाळून मोरावर अंत्यसंस्कार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 मे 2018

नवी दिल्ली : आतापर्यंत हुतात्मा जवानांसाठी किंवा महत्त्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तिंसाठी निधनानंतर तिरंग्यात गुंडाळून अंतिम संस्कार करण्याचा शासकीय नियम आहे. पण, दिल्ली पोलिसांनी चक्क एका मोराला त्याच्या मृत्यूनंतर तिरंग्यात गुंडाळले व त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत. 

नवी दिल्ली : आतापर्यंत हुतात्मा जवानांसाठी किंवा महत्त्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तिंसाठी निधनानंतर तिरंग्यात गुंडाळून अंतिम संस्कार करण्याचा शासकीय नियम आहे. पण, दिल्ली पोलिसांनी चक्क एका मोराला त्याच्या मृत्यूनंतर तिरंग्यात गुंडाळले व त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत. 

दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या परिसरातून एका जखमी मोराला उपचारासाठी दवाखान्यात नेले होते. पण, उपचारादरम्यान त्या मोराचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला लाकडी पेटीत ठेवून त्यावर तिरंगा गुंडाळून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याने आम्ही फक्त राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) पाळत होतो. त्यामुळे मोराला तिरंग्यात गुंडाळून दफन केले, असे टिळक मार्ग पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या पुढेही असे झाल्यास आम्ही अशाच प्रकारे अंत्यसंस्कार करू असेही त्यांनी सांगितले.

काही तज्ज्ञांनी मोरांवर तिरंगा गुंडाळून अंत्यसंस्कार करण्याचा कोणताही शिष्टाचार अस्तित्वात नसल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी संरक्षण कायदा 1972 चे उल्लंघन केले आहे. वन्यजीव कार्यकर्त्यांनी, मोर हा शेड्यूल -I पक्षी असल्याने पोलिसांनी वन्यजीव कायद्याचं उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे. कायद्यानुसार शेड्यूल -I वर्गातील पक्षाचा मृतदेह आढळल्यास ती राज्याची संपत्ती असून त्याच्यावर शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्याचा हक्क फक्त राज्य वनविभागाकडे आहे.

वन्यजीव कार्यकर्त्या गौरी मौलेखी यांनी सांगितले की, 'कोणतीही एनजीओ किंवा पोलीस पक्षाचं शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार करु शकत नाही. पक्षाचा मृतदेह हा वनविभागाकडे सोपवणं बंधनकारक आहे, त्यामुळे शवविच्छेदन करुन त्या संबंधित पक्षाच्या शरिरातील काही अवयव काढून त्याची तस्करी केली जात नाही ना याची खात्री करावी लागते. या प्रकरणातही शिष्टाचार पाळण्यात आलेला नसून मी वनविभागाला पत्र लिहून प्रत्येक पोलीस ठाण्याला योग्य माहिती पुरवण्यास सांगितलं आहे


संबंधित बातम्या

Saam TV Live