कांद्याच्या निर्यातीचा गाडा आला रुळावर, पाकिस्तानी आणि चीनी कांद्याला दिली मात

साम टीव्ही
गुरुवार, 4 जून 2020
  • आंतरराष्ट्रीय बाजारात नाशिकच्या कांद्याला मागणी
  • पाकिस्तानी आणि चीनी कांद्याला दिली मात
  • कांद्याच्या निर्यातीचा गाडा आला रुळावर

तीन महिन्यांपासून सुरू असलेलं लॉकडाऊन, त्यातच देशांतर्गत बाजारपेठेत बंद असलेले लिलाव अशा प्रतिकूल परिस्थितीतही नाशिकच्या कांद्याने आंतरराष्ट्रीय बाजारात बाजी मारलीय. पाकिस्तान आणि चीनच्या तुलनेत सध्या नाशिकच्या कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात पसंती मिळतेय. 

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात नाशिकच्या कांद्याचा चांगलाच बोलबाला आहे. सप्टेंबरमध्ये कांदा निर्यातीवर भारताने बंदी घातल्यावर आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तानने अव्वाच्या सव्वा दराने कांद्याची विक्री केली होती. पण आता सिंगापूर, दुबई, आणि श्रीलंकेसह अरब राष्ट्रांत नाशिकच्या कांद्याला पसंती मिळतेय.

भारतीय कांद्याला सध्या आंतराष्ट्रीय बाजारात प्रति टन २५० डॉलरचा भाव आहे. तर पाकिस्तानी कांद्याचा दर २६० डॉलर प्रति टन इतका आहे. त्यातच पाकिस्तानमध्ये घरगुती वापरासाठीच्या कांद्याची मागणी वाढल्याने पाकिस्तानी कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता नाही. 

खरं तर आखाती देशात भारतीय कांदा पोहोचण्यास सात दिवसांचा कालावधी लागतो. त्या तुलनेत पाकिस्तानचा कांदा अवघ्या दोन दिवसांत पोहोचतो. त्यातच निसर्ग चक्रीवादळामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याची आवक कमी होऊन मागणी वाढल्याने देशी बाजारात कांद्याचे भाव वाढलेत. त्यामुळे सध्या देशांतर्गत बाजार असो की आंतरराष्ट्रीय बाजार..दोन्हीक़डे नाशिकच्या कांद्याला चांगला भाव मिळतोय.


संबंधित बातम्या

Saam TV Live