नोटाबंदीवर खासदार संजय राउत यांचं मोठ्ठं विधान.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटाबंदीच्या जवळपास दोन वर्षानंतर जाहीर केलेल्या आकडेवारीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नागरिकांना पैशांसाठी बँकांबाहेर रांगांमध्ये दिवसभर उभे रहावे लागले होते, ही आकडेवारी म्हणजे नोटाबंदीचे अपयश आहे व हा एक अपराध आहे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. 

आरबीआयने जाहीर केलेला हा अहवाल आश्चर्यजनक आहे. संसदेत यावर चर्चा व्हायला हवी अशी मागणी राऊत यांनी केली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर 500 व 1000च्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे सुमारे 15 लाख 44 हजार कोटी रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यापैकी तब्बल 15 लाख 31 हजार कोटी रुपयांच्या नोटा परत आल्याचे आरबीआयने जाहीर केले आहे. म्हणजे फक्त 13 हजार कोटी रुपयांच्या नोटा बँकेत आलेल्या नाहीत. 

यापूर्वी काँग्रेसनेही मोदी सरकारवर टीका करत नोटबंदीचा निर्णय चुकल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागणार आहेत का असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

WebTitle : marathi news demonetisation shivsena sanjay raut maharashtra politics 

संबंधित बातम्या

Saam TV Live