शालेय अभ्यासक्रमात संभाजी महाराजांची बदनामी; महाराजांबद्दल अपमानास्पद लिखाण 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात अपमानास्पद लिखाण करण्यात आल्यानं पुण्यातलं वातावरण तापलंय. डॉ शुभा साठे यांनी लिहिलेल्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात ही बदनामी करण्यात आल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केलंय. त्यामुळेच संभाजी ब्रिगेडच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयात जोरदार घोषणा बाजी करून आंदोलन केलं. इतकच नाही तर  त्यांनी शिक्षण आयुक्तांना दारूच्या बाटल्याही भेट दिल्या. 

शुभा साठेंच्या या पुस्तकात संभाजी महाराजांचा उल्लेख मद्यपी असा करण्यात आल्यानं संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झालाय.

हे सरकार सत्तेच्या नशेत झिंगलंय असं म्हणत लेखिकेवर कडक कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केलीय. येत्या काळात हा वाद आणखी पेटण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे सरकार आता नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणारंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live