citizenship amendment bill : आसाम पेटले; हजारो आंदोलक आक्रमक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 डिसेंबर 2019

गुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून ईशान्येकडील राज्यांमध्ये आंदोलनाचा आगडोंब उसळला आहे. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय राज्यांत आंदोलकांनी अनेक ठिकाणांवर दगडफेक, रास्ता रोको आणि जाळपोळ केली. संतप्त आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्यांचा मारा करत, लाठीहल्लादेखील करावा लागला. नॉर्थ ईस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशन (नेसो)च्या नेतृत्वाखाली 30 विद्यार्थी संघटना रस्त्यांवर उतरल्या आहेत.

जम्मू-काश्‍मीरमधील निमलष्करी दलाच्या तुकड्या आता आसामकडे हलविण्यात येऊ लागल्या असून, आतापर्यंत पाच हजार जवान ईशान्येकडील राज्यांमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय लष्करही सावध झाले आहे.

विशेष म्हणजे आज विद्यार्थ्यांनी रस्त्यांवर उतरून उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. राज्य सचिवालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला, यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे समजते. गुवाहाटी, दिब्रुगड आणि जोरहाटमध्ये शेकडो आंदोलकांची धरपकड करण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांच्या प्रस्तावित भेटीसाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठाचीही आंदोलकांनी तोडफोड केली. या वेळी सरकारी जाहिराती आणि बॅनर्सही आंदोलनकर्त्यांनी फाडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

येथे तीव्रता अधिक
दिब्रुगडमध्ये आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्यांबरोबरच रबराच्या गोळ्यांचाही मारा करावा लागला. या वेळी आंदोलकांच्या दगडफेकीमध्ये काही पत्रकारही जखमी झाले. जोरहाट, गोलाघाट, दिब्रुगड, तिनसुखिया, शिवसागर, बोनगाईगाव, नगाव, सोनीतपूर आणि अन्य जिल्ह्यांमध्ये आंदोलनाची तीव्रता अधिक होती. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या छाबुआ या मतदारसंघामध्येच मोटारसायकल रॅली काढून या विधेयकाचा विरोध करण्यात आला.

दिवसभरात काय घडलं?
आसाममधील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द
व्यापारपेठा बंद; रेल्वे वाहतुकीला फटका
राज्यातील चौदा रेल्वे गाड्या रद्द; मार्गांतही बदल
लकवामध्ये तेलप्रकल्पावर हल्ल्याचा प्रयत्न
अनेक भागांमध्ये लष्कराचे ध्वजसंचलन
गुवाहाटीत भाजप नेत्यांचे पुतळे जाळले
केंद्रीय मंत्री हेमंतविश्‍व शर्मांना दाखविले काळे झेंडे
दिब्रुगडमध्ये विद्यार्थ्यांचा दिसपूर "चलो मार्च'
त्रिपुरामध्ये इंटरनेटसेवा बंद; आंदोलन अधिक तीव्र

Web Title: Despite Curfew, Thousands Protest CAB on Guwahati Streets
 
संबंधित बातम्या

Saam TV Live