देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला सर्वाधिक 10 वेळा भेट देणारे एकमेव मुख्यमंत्री!

देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला सर्वाधिक 10 वेळा भेट देणारे एकमेव मुख्यमंत्री!

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एक मे रोजी 15 पोलिस ठार झाल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहखात्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच काॅंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील हे तेथे बुलेटवरून फिरत होते, आताचे मुख्यमंत्री गडचिरोलीला जात नाहीत, अशी टीका झाली होती.

या टिकेला मुख्यमंत्री कार्यालयाने प्रत्युत्तर दिले असून गडचिरोलीला सर्वाधिक वेळा भेट देणारे फडणवीस हे एमकेव मुख्यमंत्री असल्याचा दावा केला आहे. या कार्यालयाने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची यादीच प्रसिद्ध दिली आहे. या यादीत दोन मे रोजी मुख्यमंत्र्यांनी शहिदांना मानवंदना देण्याच्याही भेटीचा समावेश आहे. ही यादी पुढीलप्रमाणे

24 नोव्हेंबर 2014: मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली ग्रामीण भागात भेट गडचिरोलीत. कुरखेडयातील प्रकल्पांचा आढावा, देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

25 फेब्रुवारी 2016: आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी नवजीवन नगरचे भूमिपूजन, बुर्गी पोलिस ठाण्याचे उदघाटन. शौर्य पुरस्कार मिळवणार्‍या तसेच विविध उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या पोलिसांचा सन्मान. आत्मसमर्पण करणार्‍या 5 नक्षल्यांना धनादेश आणि भूखंड वाटप, गडचिरोलीत एक हजार पोलिस राहू शकतील, अशा वसतीगृहाचे उदघाटन. 1988 ते 2009 या काळात शहीद झालेल्या पोलिसांना 23 कोटी रूपये जाहीर. पूर्वीच्या नक्षली कारवाईत शहीद झालेल्यांची शंभरावर कुटुंब या मदतीपासून वंचित होती. या कुटुंबांना 22.50 लाख रुपये प्रत्येकी मदत

16 डिसेंबर 2016 : निवडणूक सभा

30 डिसेंबर 2016: सिरोंचा येथे गोदावरी नदीवरील आंतरराज्य पुलाचे उदघाटन. 292 कोटी रूपये खर्च करून हा 1.6 कि.मी लांबीचा पूल. गडचिरोली ते मूल, गडचिरोली ते आष्टी आणि नागभीड ते आरमोरी या तीन रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

13 फेब्रुवारी 2017: निवडणूक सभा

12 मे 2017 : लॉईड प्रकल्पाला जागा हस्तांतरणाचा कार्यक्रम (कोनसरी), चामोर्शीत जलयुक्तच्या कामाला भेट, आलापल्ली येथे आढावा बैठक

15 एप्रिल 2018: गडचिरोली येथे जिल्हा महिला आणि बाल रूग्णालयाचे उदघाटन

18 फेब्रुवारी 2019: 82 गावातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन

8 एप्रिल 2019: निवडणूक प्रचारसभा

2 मे 2019: शहिदांना मानवंदना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com