उद्धव ठाकरे यांचं अयोध्येला जाणं हे युतीसाठी पोषक - देवेंद्र फडणवीस 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेतलं. दोन दिवसांपासून अयोध्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना आणि भाजपाचा हिंदुत्व हा एकमेव उद्देश असल्याने उद्धव ठाकरेंनी अयोध्याला जाणं चांगलंच आहे. राम मंदिर उभारणे हा राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं अयोध्येला जाणं हे युतीसाठी पोषक असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, दोन दिवसांचा अयोध्या दौरा आटपून उद्धव ठाकरे मुंबईकडे परतले.  

संबंधित बातम्या

Saam TV Live