फडणवीस आणि महाजनांनी मिळून माझं तिकीट कापलं - खडसेंचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 जानेवारी 2020

जळगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मिळून माझे विधानसभेचे तिकीट कापले. माझे राजकारण संपविण्याचा त्यांचा डाव आहे, असा खळबळजनक आरोप भाजपचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे.

जळगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मिळून माझे विधानसभेचे तिकीट कापले. माझे राजकारण संपविण्याचा त्यांचा डाव आहे, असा खळबळजनक आरोप भाजपचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे.

मुक्‍ताईनगर येथे एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे म्हणाले, की दिल्ली येथील बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मला विधानसभेची उमेदवारी देण्याची तयारी होती. मात्र, देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांनी त्याला नकार दिला. त्यामुळेच माझे तिकीट कापले गेल्याची माहिती मला पक्षाकडून मिळाली आहे. माझे तिकीट का कापले? माझा काय गुन्हा होता? असे मी पक्षाकडे वारंवार विचारणा केली होती. त्यातूनच मला दिल्ली येथील कोअर कमिटीच्या सदस्यांनी सांगितले.

खडसे यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलीला पक्षीय राजकारणातून पाडापाडीची लेखी तक्रार पक्षाच्या वरिष्ठांकडे केली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी कोणाचेही नाव जाहीर केले नव्हते. आता त्यांनी प्रथमच पक्षातील नेत्यांची नावे जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.

चुकीच्या उमेदवारांमुळे सरकार पडले
भाजपने विधानसभेत चुकीचे उमेदवार दिले. त्यामुळेच अनेक ठिकाणी पक्षाला पराभव पत्करावा लागला. परिणामी, राज्यात कमी जागा आल्या आणि सरकारही पडले. माझी हक्काची जागाही त्यांनी घालवली, असा आरोपही खडसे यांनी यावेळी केला.

Web Title: Devendra Fadnavis and Girish Mahajan together cut my assembly ticket  says Eknathrao Khadse


संबंधित बातम्या

Saam TV Live