कर्जावरील व्याज शेतक-यांकडे मागणा-या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बरखास्त करण्यात येतील - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यापासून, प्रत्यक्ष लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा होईपर्यंतच्या काळातील कर्जावरील व्याज शेतक-यांकडे मागणा-या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बरखास्त करण्यात येतील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला. या कालावधीतील व्याजाची वसुली बँकांनी शेतक-यांकडून करू नये, असा निर्णय राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. असं असतानाही चार-पाच बँका व्याजाची ही रक्कम शेतकऱ्यांनी भरावी यासाठी सक्ती करीत आहेत.

शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यापासून, प्रत्यक्ष लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा होईपर्यंतच्या काळातील कर्जावरील व्याज शेतक-यांकडे मागणा-या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बरखास्त करण्यात येतील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला. या कालावधीतील व्याजाची वसुली बँकांनी शेतक-यांकडून करू नये, असा निर्णय राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. असं असतानाही चार-पाच बँका व्याजाची ही रक्कम शेतकऱ्यांनी भरावी यासाठी सक्ती करीत आहेत. त्याचबरोबर, कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीत कर्जमाफीसाठी अर्ज करता येणार आहे


संबंधित बातम्या

Saam TV Live