देवकुंड की मृत्युकुंड? 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील हा देवकुंड धबधबा. आकाशातून तुषार असे कोसळतात जसे स्वर्गातून कुणी जलकुंभ पृथ्वीवर ओतलाय. पर्यटकांना देवकुंड खुणावणार नाही तर नवलच.

पण, देवकुंडचं सौंदर्य शापित यक्षासारखं झालंय. देवकुंडला दुर्घटनांचा शाप लागलाय. पुण्यातून फिरण्यासाठी आलेल्या तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू झालाय. पाण्याचा अंदाज न आल्यानं अतिउत्साहात केलेलं धाडस त्यांच्या जिवावर बेतलंय.

यापूर्वीही देवकुंड धबधब्याजवळच्या ओढ्यांमध्ये अनेकजण वाहून गेलेत. देवकुंड धबधब्यातही अनेकांचा बळी गेलाय.

धबधबा सुंदर दिसला तरी मनावर ताबा ठेवा. अतिउत्साहात नसतं धाडस करू नका. नाही तर देवकुंडची वाट थेट तुम्हाला स्वर्गात नेईल.

संबंधित बातम्या

Saam TV Live