देवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई देवीचा शिमगोत्सव उत्साहात

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 मार्च 2018

साडवली - देवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाईचा शिमगोत्सव उत्साहात सुरु झाला आहे. यंदा नगर होळी देवघर गावातून आणण्यात आली. यावर्षी देवरुखमधील भायजेवाडी, तांबळवाडी, मांडवकरवाडी, गेल्येवाडी मधील ग्रामस्थांनी ही होळी आणली. कारखानदार कुमकर यांच्यासह नागरीक यामध्ये सहभागी झाले होते.

बौद्धवाडी ग्रामस्थांनी प्रथम पूजा केली. नगरहोळी पाराजवळ ही होळी कुमकर कारखानदार, चतुःसिमेचे नागरीक यांनी वासे व हळदवेलीच्या सहाय्याने जेटली गेली. मानकर्‍यांनी जाबजबानी करुन जाप घातला व ही जेटलेली होळी रेटत रेटत चर्मकार वाडीतून मंदिरापर्यंत नेण्यात आली. यावेळी या सोहळ्याला जञेचे स्वरुप प्राप्त झाले होते. आज ( ता. 2) ही होळी उभी राहील, उद्या (ता. 3) पालखीतील देवतांना रुपे लागतील. चार तारखेपासुन मानकरी व भाविकांच्या घरोघरी ही पालखी जाणार आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live