आता प्रकाश मेहता यांना तुरुंगात पाठवणार का ? - धनंजय मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जून 2019

मुंबई : मुंबईतील ताडदेवच्या एम. पी. मिल कंपाउंड एफएसआय गैरव्यवहाराचा आरोप करणारे राधाकृष्ण विखे पाटील आता गृहनिर्माणमंत्री झाले आहेत आणि आता ते महेता यांना तुरुंगात पाठवणार का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते.
 
मंत्रिमंडळातून वगळलेल्या आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही धनंजय मुंडे यांनी केली. राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत दिलेले एकही आश्वासन पाळले नाही, राज्यपालांचे अभिभाषण आणि राज्यातल्या वस्तुस्थितीचा काडीमात्र संबंध नाही, असा आरोप मुंडे यांनी या वेळी केला. 

भाजपने राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर लोकसभेची निवडणूक जिंकली, यापूर्वीच्या सरकारांनी राष्ट्रवादावर कधीच मते मागितली नाहीत, कारण त्या सरकारांची कामगिरी भरीव होती, भाजपने मात्र हुतात्म्यांच्या नावावर मते मागितली. जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांना बगल देत ईव्हीएमच्या मदतीने लोकसभा जिंकली, अशी टीका मुंडे यांनी केली. 

मुंडे म्हणाले, की भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सत्तेवर येण्यापूर्वी केली होती, उत्पन्न दुप्पट झाले नाही, उलट शेतमालाचे भाव पाडण्याचे कटकारस्थान या सरकारने केले, उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 2022 चा वादा करून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा धूळ फेकण्याचे काम सरकार करीत आहे. 

WebTitle : marathi news dhananjay munde demands imprisonment  of prakash mehta 

संबंधित बातम्या

Saam TV Live