धनंजय मंडेंचा पंकजा मुंडेंना टोला, म्हणे "गडापेक्षा कोणीही मोठे नाही"

धनंजय मंडेंचा पंकजा मुंडेंना टोला, म्हणे "गडापेक्षा कोणीही मोठे नाही"

पाथर्डी : "संत भगवान बाबांमध्ये एक पावित्र्य होतं. त्या पावित्र्यातूनच बाबांनी भगवानगडाची निर्मिती केली. राजकीय द्वेषातून उद्या कोणी कुठेही गड उभा करील; मात्र हा गड, गादी आणि महंतांपेक्षा कोणीही मोठं नाही,'' असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव घेता न लगावला. या वेळी गडावर भाविकांनी आणलेल्या मोठा हार मुंडे यांना क्रेनच्या साह्याने घालण्यात आला.

चंद्रकांत पाटलांना सहकार समजायला दुसरा जन्म घ्यावा लागेल : खडसे https://t.co/vVKUMWAHMY

— MySarkarnama (@MySarkarnama) January 9, 2020

मुंडे म्हणाले, ""राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि धर्मकारण धर्मकारणाच्या ठिकाणी चांगलं असतं. मी भक्त म्हणुन येथे आलो. भगवानगड हे शक्तीपीठ आहे. त्यावरून महंतांनी आम्हाला काही मागावं, असं नाही आणि आम्ही ते देण्याएवढे मोठे नाहीत. सेवा म्हणुन करू, ती माझी जबाबदारी असेल. 

मंत्री मुंडे गुरुवारी दुपारी भगवानगडावर आले होते. संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर, मंत्री मुंडे यांनी महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांची भेट घेतली. भगवान बाबा व विठ्ठलाची मुर्ती देऊन महंतांनी त्यांचा गौरव केला. 

खऱ्या अर्थाने आज न्याय झाला
मंत्री मुंडे म्हणाले, ""गडाची व त्यावर श्रद्धा असणाऱ्या भक्तांची सेवा करण्याची संधी मंत्रीपदाच्या माध्यमातून मिळाली, हे माझं भाग्यच! मी 2014मध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता असताना, भगवानगडावर आलो होतो, तेव्हा काही लोकांनी माझ्या वाहनावर दगड मारले. आज संत भगवान बाबा व महंत नामदेशास्त्री महाराज यांनी खऱ्या अर्थाने न्याय केला, असं म्हणावं लागेल. सुवर्णाक्षरांनी लिहावा, असा दिवस माझ्यासाठी आजचा आहे. मी मंत्री होणार, हे माहीत झाल्यावर गडाचे महंत मुंबई येथील माझ्या निवासस्थानी आले. मंत्री झाल्यावर भगवानगडावर दर्शनासाठी या, अशी आज्ञा केली.''

भक्त म्हणुन आलोय
""हा गड संत भगवान बाबांचा आहे. भले काहींनी ठरवलं असेल, की या गडावर दगड मारावीत. मला बाबांपासून वेगळं करावं. मठाधिपती न्यायाचार्य आहेत. मठाधिपतींनी मला न्याय दिला. मला हे वाटलं नव्हतं. हा चमत्कार आहे. ही बाबांची शक्ती आहे. गडाचं व आमचं अनेक पिढ्याचं नात आहे. तीच श्रद्धा व भक्ती घेऊन आलोय. मंत्री म्हणून जबाबदारी असली, तरी मी भक्त म्हणुन आलोय,'' असे मंत्री मुंडे म्हणाले

Web Title - Dhananjay munde statement on pankaja munde 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com