अमेरिकेत घुमतोय ढोल-ताशांचा गजर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

ढोल, ताशा, झांज आणि लेझीम यांच्याबद्दल महाराष्ट्रीय लोकांना काही सांगणं म्हणजे अमेरिकन लोकांना जॉर्ज वॉशिंग्टनचं महत्त्व सांगण्यासारखं आहे. ही खरं तर पारंपरिक रणवाद्य आहेत; पण आता त्यांनी सण-समारंभ-विजयोत्सवात स्थान पटकावलं आहे.

मराठी मातीवरील प्रेमापोटी आम्ही आमच्या पथकाचं नाव ‘महाराष्ट्र माझा ढोल-ताशा-झांज-लेझीम पथक’ ठेवलं. हे पथक नोव्हेंबरमध्ये ऑस्टिन, टेक्‍सास, युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका इथं काही उत्साही कुटुंबांनी एकत्र येऊन स्थापन केलं. सुरुवातीला २० कुटुंबं आणि ५० वर लोक या पथकात सामील झाली होती.

आज याचा पसारा ४५ च्या वर कुटुंबं आणि ७५च्या वर लोक इतका वाढलेला आहे. ४ वर्षांच्या सोनुल्यापासून ७० वर्षांच्या चिरतरुणापर्यंत सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष या पथकात सामील आहेत. ३० च्या वर ढोल, १५ च्या वर ताशे आणि ५० च्या वर झांज आणि लेझीम खेळणारे लोक. ऑस्टिन शहरातलं हे अशा प्रकारचं सगळ्यात मोठं पथक. ऑस्टिन शहरातच काय, तर संपूर्ण नॉर्थ अमेरिकेतील हे एक दखलपात्र पथक आहे. या पथकाचं उद्दिष्ट म्हणजे उत्तर अमेरिकेत ढोल, ताशा, झांझ आणि लेझीम या समृद्ध संस्कृतीचा प्रसार करणे. विशेषत: उत्साहानं थबथबलेल्या ऑस्टिन शहरात ही परंपरा भारतीय आणि अमेरिकन लोकांपर्यंत पोचवणं हे महत्त्वाचं.

अनेक कार्यक्रमांत पथकानं सामील होऊन ऑस्टिनकारांना डोलायला आणि नाचायला लावलं. ४ जुलै या अमेरिकन स्वातंत्र्यदिनी परेडमध्ये पथकानं आपलं पहिलं सार्वजनिक सादरीकरण केलं.

Web Title dhol tasha pathak in america

संबंधित बातम्या

Saam TV Live