धुळे जिल्हा रेड झोनमध्ये, कोरोना रुग्णांची संख्या 15

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 एप्रिल 2020

धुळे जिल्हा ग्रीन, ऑरेंज झोन मधून आता रेड झोनमध्ये गेलाय. कोरोना बधितांची संख्या ८ वरून १५ वर गेल्यानं धुळ्याची चिंता वाढली आहे. 

धुळे जिल्हा ग्रीन, ऑरेंज झोन मधून आता रेड झोनमध्ये गेलाय. कोरोना बधितांची संख्या ८ वरून १५ वर गेल्यानं धुळ्याची चिंता वाढली आहे. . कोरोना बाधित रुग्णांची संख्या धुळ्यात ७ने वाढलीये. या सात रुग्णांमध्ये एक महिला रुग्ण शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील आहे .तर उर्वरित सहा रुग्ण हे धुळे शहरातील ताशा गल्ली, मच्छीबाजार परिसरातील आहेत. 

धुळे 'सेफ' असल्यामुळे सुरुवातीला ग्रीन झोनमध्ये आपण आहोत, असा समज असलेल्या धुळेकरांना संसर्गजन्य कोरोना व्हायरसने आता चिंतेत टाकले आहे. जिल्ह्यात या आजाराचे आतापर्यंत एकूण १५, तर एकट्या धुळे शहरात १२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रेड झोनमधील धुळे शहर कोरोनाचे हॉट स्पॉट झाले आहे.

धुळे जिल्ह्यात सर्वप्रथम कोरोनाचा पहिला रुग्ण १० एप्रिलला साक्री शहरात आढळला होता. त्याची कॉन्टक्ट ट्रेसिंग सुरु असताना धुळे शहरात २० एप्रिलला तिरंगा चौक परिसरातील एका प्रतिष्ठिताच्या भावाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आणि यानंतर या आजाराने धुळे शहराला चिंतेत टाकले आहे. यातून उपाययोजना करणारे प्रशासन सावरत नाही तोपर्यत २१ एप्रिलला धुळे शहरामध्ये आणखी चार, तर बाह्मणे (ता. शिंदखेडा) येथे कोरोनाचा एक रुग्ण आढळला. 

२१ एप्रिल पर्यंत धुळे शहरात एकूण सहा, साक्री शहरात एक आणि शिंदखेडा तालुक्यात एक, असे आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यात धुळे शहरातील ताशा गल्ली परिसरातील ५७ वर्षीय पॉवरलूम व्यावसायिक व शेतकरी आणि साक्री शहरातील ५३ वर्षीय बांधकाम कारागीर यांचा मृत्यू झाला आहे. शिंदखेडा तालुक्यातील ७० वर्षीय महिलेवर उपचार सुरु आहेत. 

प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर

शेजारच्या मालेगाव, सेंधवा येथे दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असताना धुळेकरांच्या काळजाचा ठोका चुकतच होता. त्यातच आज सकाळी धुळे शहरात ताशा गल्ली परिसरात बाधित एकाच कुटुंबातील नव्याने सहा, तर आमोदे (ता. शिरपूर) येथे ४५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे संसर्गजन्य कोरोना व्हायरसने जिल्ह्याला घेरल्याचे लक्षात येताच जिल्हा सरकारी यंत्रणा गर्भगळीत झाली असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनाना वेग आला आहे. या धोक्याच्या घंटेमुळे धुळेकरांनी आता घरातच राहावे हे नव्याने सांगण्याची गरज उरलेली नाही.     


संबंधित बातम्या

Saam TV Live