अफवेमुळे गावकऱ्यांनी गाठली क्रौर्याची परिसीमा..  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 जुलै 2018

किडन्या काढण्यासाठी लहान मुले पळविणारी टोळी गावात आल्याच्या अफवेने, पाच जणांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अफवेचे भूत डोक्यात संचारलेल्या ग्रामस्थांनी रविवारी साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील, आठवडा बाजारात पाच जणांना जबर मारहाण करून ठार केले. हे सर्व जण ज्योतिष सांगून उपजीविका करणारे भटक्या समाजातील होते. ते सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याहून आले होते.

मारहाण करत या संशयितांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडण्यात आले. तेथेच जमावाने दगडाने ठेचून, लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण करीत त्यांना ठार मारले. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील खवे गावचे दादाराव शंकर भोसले, भारत शंकर भोसले, राजू भोसले, भारत माळवे आणि मानेवाडीतील आगनू भोसले यांना दगड आणि काठ्यांनी ठेचून क्रूरपणे मारले. क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या या घटनेत पोलिसांनी हस्तक्षेप करण्याआधीच पाचही जणांची जबर मारहाणीने ओळखूही येणार नाही, अशी रक्तबंबाळ अवस्था झाली होती. पोलीस येताच जमावाने त्यांच्याकडेही मोर्चा वळविला. मारहाणीत दोन पोलीस जखमी झाले. मारहाणीच्या व्हिडीओ समोर आल्यानंतर, मारहाण करणाऱ्यांची ओळख पटवून पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे.

दरम्यान, मालेगावच्या आझादनगर भागातही मुलं पळविण्याचे संशयावरून काही लोकांना जमावाकडून मारहाण करण्यात आलीये.  संतप्त झालेल्या जमावानं पोलिस व्हॅनही  उलटविली. मालेगावात तणावाचं वातावरण. कालच धुळ्यात मुलं चोरण्याच्या संशयावरून 5 जणांना मारहाण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झालाय.  

संबंधित बातम्या

Saam TV Live