धुळ्यात सोन्याने भरलेला हंडा

धुळ्यात सोन्याने भरलेला हंडा


धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील थाळनेर गावात बाजारपेठ भागात आधार बुधा मराठे यांच्या मालकीची जागा आहे. त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी बांधकामाला सुरवात केली. पाया खोदण्याचे काम गावातील राकेश सुभाष सावळे व दिलीप भोई या मजुरांना देण्यात आले.
खोदकाम सुरू केल्यावर त्यांनी एक खड्डा अपूर्ण ठेवला. तो नंतर खोदू असे सांगितले. त्यामुळे संशय आल्याने मराठे यांनी चौकशी केली असता त्या खड्ड्यात सोन्याचे दागिने व नाण्यांनी भरलेली कळशी सापडली असून हा मुद्देमाल राकेश सावळे याने टोपलीत भरून वर माती टाकून घरी नेल्याचे उघडकीला आले. मात्र मराठे यांना राकेशने दाद दिली नाहीच, उलट दमदाटी केली. गेल्या तीन महिन्यात त्याने या सोन्याची विक्री करून 50 ते 60 लाख रुपयांची उलाढाल केल्याचे मराठे यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे.
हे सोने विकण्यासाठी राकेश सावळे याला कोणत्या सोनाराने मदत केली, मध्यप्रदेशापर्यंत हे सोने कसे पोहचले याबाबत चर्चा सुरू असून 
संबंधित दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या कडून पावणे सहा तोळे सोन्याची नाणी आणि साधारण अर्धा किलो चांदी ताब्यात घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
साधारण हजारो वर्षांपूर्वी हे सोने मातीत गाडले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. 

web tittle: The laborer has been found to be filled with gold ornaments filled with gold jewelry

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com