धुळे जिल्ह्यात माकडांचा हैदोस; माकडांचा बंदोबस्त कधी करणार वनविभाग?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

धुळे : मर्कटलीला हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर... उच्छाद मांडून हैराण करणारी माकडांची टोळीच उभी राहते.. 
त्यामुळे सर्वसामान्य या माकडांपासून दोन हात... नव्हे तर दोनशे फूट दूर राहणंच पसंत करतात.. 
पण म्हणतात ना संकटांपासून जितकं दूर पळावं.. संकट तितक्याच वेगाने पाठीशी येतात.. 

धुळे : मर्कटलीला हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर... उच्छाद मांडून हैराण करणारी माकडांची टोळीच उभी राहते.. 
त्यामुळे सर्वसामान्य या माकडांपासून दोन हात... नव्हे तर दोनशे फूट दूर राहणंच पसंत करतात.. 
पण म्हणतात ना संकटांपासून जितकं दूर पळावं.. संकट तितक्याच वेगाने पाठीशी येतात.. 

सध्या धुळेकरांचीही काहीशी अशीच बिकट अवस्था झालीय.. आणि याला कारण ठरलीय ती हैदोस घालणारी माकडांची टोळी... 
हनुमानाचा अवतार.. संकटमोचक अशी ओळख असणाऱ्या या माकडांनीच स्थानिकांना संकटात टाकलंय... त्यामुळे कधी एकदाची ही ब्याद
गावातून बाहेर जातेय, असं गावकऱ्यांना झालंय.. 

एरव्ही मंदिरात किंवा पर्यटन स्थळी या माकडांना सहज खाद्य उपलब्ध होतं.. पण धुळ्यातल्या शेंदवडसारख्या ठिकाणी तशी सोय उपलब्ध नाही.. त्यामुळे
भुकेलेल्या माकडांनी थेट एल्गार पुकारत आता, गावकऱ्यांवरच हल्लाबोल करण्यास सुरुवात केलीय... अन्नाच्या शोधात या माकडांनी 
घराची कुलपं, कवाडं,  खिडक्या उचकटण्यास सुरुवात केलीय... एवढ्यावरच थांबतील तर ते माकडं कसली... त्यांनी तर थेट घरात घुसून मिळेल त्या
गोष्टींवर ताव मारण्यास सुरुवात केलीय.. शिवाय घरात घुसून केलेली तोडफोड ती वेगळीच... यामुळे नागरिक भयानक त्रस्त झालेत..
या माकडांचा हैदोस आवरण्यासाठी नागरिकांनीच उपाययोजना करण्यास सुरुवात केली.. पण माकडांना अटकाव करणं या ग्रामस्थांच्या अंगाशी आलंय.. 
कुणाला माकडाने ओरबाडलं... तर कुणाच्या खांद्याचा, अंगाचा चावा घेतला... त्यामुळे माकडांची टोळी पाहताच ग्रामस्थ त्राहिमाम करत दुसऱ्या दिशेला
धाव घेतायत... 

कुणी देव पाण्यात ठेवलेत.. तर कुणी थेट वनविभागालाच नवस केलाय... त्यामुळे माकडांच्या या जीवघेण्या मर्कटलीलांमधून कधी सुटका होणार हे 
एकतर प्रशासनाला ठाऊक... नाही तर त्या 'हनुमानालाच'.. होऊ शकतं, वनविभागाआधीच ग्रामस्थांना हनुमान पावेल, अन् माकडं 'जय श्री राम'
म्हणत कदाचित गावाची वेस ओलांडून जातीलही... 

Web Title : Monkeys Attacking People In Dhule


संबंधित बातम्या

Saam TV Live