धुळ्यात पाच जणांची जमावाकडून हत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 1 जुलै 2018

अफवांचा बाजार गरम झाला की तो लोकांच्या कसा जिवावर उठतो हे आज पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा गावात जमावानं मुलं पळवणारी टोळी समजून पाच जणांची हत्या केलीय.

राईनपाडा गावात आज बाजाराचा दिवस होता. बाजारात सातारा सांगलीकडची टोळी मुलं पळवण्यासाठी आल्याची अफवा पसरली. ही अफवा असतानाच पाच जण निष्पाप गावकऱ्यांच्या तावडीत सापडले. या पाच जणांना अमानुष मारहाण करण्यात आली.

रक्तबंबाळ अवस्थेत या पाचही जणांना ग्रामपंचायत कार्यालयात टाकण्यात आलं. तिथंही त्यांना मारहाण झाली. ही मारहाण एवढी अमानुष होती की पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. मारहाण झालेल्यांना सोडवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पण  पोलिसांवरच जमावानं हल्ला केला. यात दोन पोलिस जखमी झालेत. यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात मुलं पळवणाऱ्या टोळीच्या अफवेनं अनेक निष्पापांनी मार खाल्ला होता. आता तर पाच जण निष्पाप या अफवेचे बळी ठरलेत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live