मधुमेह असणाऱ्यांनो सावधान! कोरोना असणाऱ्या रुग्णांमध्ये दिसतायत ही नवी लक्षणं

साम टीव्ही
शनिवार, 27 जून 2020
  • मधुमेहबाधित रुग्णांमध्ये अनियंत्रित शुगर वाढ
  • कोरोनाच्या नवीन लक्षणांमुळं डॉक्टरही चक्रावले
  • मधुमेह असलेल्या रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका

मुंबईत धडधाकड कोरोना रुग्णांमध्ये कोरोनाची नवीन लक्षणं आढळून आली आहे. जे कोरोना रुग्ण सुस्थितीत आहेत, मात्र ज्यांना मधुमेह आहे, अशांमध्ये शुगर लेव्हल अनियंत्रितपणे वाढतेय. ही शुगर नियंत्रणात आणण्याचं आव्हान सरकारी आणि खासगी कोव्हीड रुग्णालयांपुढं उभं राहिलंय.

यामुळं धडधाकड मात्र मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय.अशा रुग्णांची प्रकृती शुगर वाढल्यानं चिंताजनक बनतेय..शुगर अनियंत्रिक का होतेय, यावर सध्या केईएम रुग्णालयातल्या डॉक्टरांचं एक पथक शोध करतंय. चीननंतर भारतात जगातील सर्वाधिक मधुमेह असणाऱ्यांची संख्या आहे...भारतात दर सहा जणांमागे एकाला मधुमेहाचा त्रास आहे..हे पाहता ही लक्षणं अतिशय गंभीर असल्याचं डॉक्टर सांगताहेत.

पाहा, व्हिडिओ - 

मधुमेह नसलेल्या धडधाकट करोना रुग्णांची शुगर लेव्हल अनियंत्रितपणे का वाढत आहे? याचा केईएमच्या डॉक्टरांचं एक पथक अभ्यास करत असून लवकरच त्याचं उत्तर मिळेल असं सांगितलं जात आहे. भारतात करोना व्हायरसचा संसर्ग पसरण्याआधीपासून मधुमेह हा आजार होता. भारतातील सुमारे ७.७ कोटी लोकांना मधुमेह होता. चीननंतर सर्वाधिक मधुमेही रुग्ण असलेला भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. चीननंतर भारतात सहा लोकांमागे एकाला मधुमेह असल्याचं तज्ज्ञ सांगतात. चिंताजनक बाब म्हणजे २०४५ पर्यंत भारतात १३.४ कोटी मधुमेही रुग्ण वाढण्याची शक्यता इंटरनॅशनल डायबेटिस


संबंधित बातम्या

Saam TV Live