एका कॉलवर घरपोच डिझेल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 मे 2018

एका कॉलवर घरपोच डिझेल
कोल्हापूर - ‘डिझेल घरपोच मिळेल’ आश्‍चर्य वाटलं. खरंच आहे. अमोल कोरगावकर यांनी हा उपक्रम कोल्हापुरात सुरू केला आहे. त्यांच्याकडील तीन हजार लिटरचा टॅंकर थेट तुमच्या दारात येऊन तुम्हाला डिझेल देण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. मुंबईनंतर थेट कोल्हापुरातच हा उपक्रम सुरू झाला आहे. अनेक उद्योजकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

एका कॉलवर घरपोच डिझेल
कोल्हापूर - ‘डिझेल घरपोच मिळेल’ आश्‍चर्य वाटलं. खरंच आहे. अमोल कोरगावकर यांनी हा उपक्रम कोल्हापुरात सुरू केला आहे. त्यांच्याकडील तीन हजार लिटरचा टॅंकर थेट तुमच्या दारात येऊन तुम्हाला डिझेल देण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. मुंबईनंतर थेट कोल्हापुरातच हा उपक्रम सुरू झाला आहे. अनेक उद्योजकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
कोल्हापुरात नवनवीन कल्पना सत्यात येतात. येथेच फिरता रंगमंच तयार झाला. पाण्यावरील मोटार चालण्याची पहिली चाचणी  कोल्हापुरातच झाली. उद्योग क्षेत्रातील नावीन्य कोल्हापुरात पाहावयास मिळते. यातीलच हा एक उपक्रम आहे. डिझेल घरपोच मिळेल, ही कल्पनाच भन्नाट आहे.  
पुलाची शिरोली येथील सांगली फाट्यावरील कोरगावकर पेट्रोल पंपावर मालक स्वतः चालकांबरोबर येत होते. डिझेल भरून बिल देऊन मालक निघून जात होते. अनेक संस्थांमध्ये १०-१५ बसेस आहेत, ट्रक आहेत. त्यांचे व्यवस्थापक थेट पंपावर येऊन सर्वच गाड्यांमध्ये डिझेल भरत होते. यामुळे कोरगावकर पेट्रोल पंपची दुसरी पिढी अनिकेत आणि राज कोरगावकर यांनी घरपोच डिझेल सेवा सुरू केली तर? असा मुद्दा उपस्थित केला. यावरच ते थांबले नाहीत, त्यांनी तेल कंपनीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घरपोच डिझेलची सेवा सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरू केली. बघतबघता मुंबईच्या धर्तीवर ही सेवा कोल्हापुरात सुरू करण्याचा उपक्रम सत्यात येऊ लागला. आज तीन हजार लिटर डिझेल घेऊन टॅंकर शहर परिसरात फिरू लागला.

अशी आहे संकल्पना

  •  टॅंकरवर ‘डिलिव्हरी युवर डोअरस्टेप’ आणि संपर्क क्रमांक लिहिला आहे. 
  •  स्कूल बस, ट्रान्स्पोर्टकडून अधिक मागणी
  •  फॅक्‍टरीमधील जनरेटरसाठी ही सेवा उपयोगी
  •  टॅंकरमध्येच पंपासारखी व्यवस्था आहे. 
  •  अडीचशे लिटरच्या पुढे घरपोच डिलिव्हरी
  •  पंपापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर डिलिव्हरी

व्यवसायात नवनवीन कल्पना आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. ग्राहकांना सुविधा देणे, त्यांचे हीत पाहण्याचा आमचा दृष्टिकोन पहिल्यापासून आहे. त्यामुळेच आम्ही नफ्यातील काही हिस्सा समाजसेवेसाठी देतो. ‘घरपोच डिझेल डिलिव्हरी’ ही सेवा सुरू केली आहे. रोज तीन हजार लिटरची मागणी पूर्ण होत आहे.
- राज व अनिकेत कोरगावकर,
मालक, कोरगावकर पेट्रोल पंप


संबंधित बातम्या

Saam TV Live