आता थेट सरपंच निवड नाही - फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय डावलला!

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 16 डिसेंबर 2019

भाजपच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा नव्या सरकारने लावलाय. याच मालिकेत थेट सरपंच निवडीच्या निर्णयालाही स्थगिती देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 

भाजपच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा नव्या सरकारने लावलाय. याच मालिकेत थेट सरपंच निवडीच्या निर्णयालाही स्थगिती देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 

थेट सरपंचाच्या निवडीला आता ब्रेक लागणार आहे. कारण थेट सरपंचपदाच्या निवडीबाबात फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय रद्द करण्याचा निर्णय नव्याने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने घेतलाय. सोमवारपासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात त्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
थेट सरपंच निवडणुकीमुळे घोडेबाजार जरी टळला असला तरीही अनेक तोटे समोर आलेत. अनेकदा सरपंच एका पक्षाचा तर सदस्यांपैकी बहुसंख्य सदस्य दुसऱ्याच पक्षाचे असल्याने विकासकामांबाबतच्या निर्णय प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार २०१४ साली सत्तेत आल्यानंतर थेट नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीचा निर्णय घेतला होता. त्याचा राजकीयदृष्ट्या मोठा फायदा भाजपला झाला होता. आता पुढच्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यातील तब्बल १० हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.  त्या पार्श्वभूमीवर तातडीने हा निर्णय घेण्यात येणार आहे.

Web Title -  direct  Sarpanch post will be canceled


संबंधित बातम्या

Saam TV Live