दिशाला न्याय मिळाला, मात्र निर्भयाच्या न्यायासाठी अजून खस्ता सुरुच

दिशाला न्याय मिळाला, मात्र निर्भयाच्या न्यायासाठी अजून खस्ता सुरुच

दहा दिवसांपूर्वी, हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून, तिला जिवंत जाळण्यात आलं होतं. या प्रकरणातील चारही संशयित आरोपींना आज, सायबराबात पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं.

अशा नेहमी होणाऱ्या बलात्कारांमुळे देश पूर्णपणे हादरुन जातो. मग मेणबत्त्या पेटवून आंदोलनं करुन सरकारला आरोपींना शिक्षा देण्यासाठी मागण्या केल्या जातात. मात्र सरकार काही दखल घेत नाही. आणि याउलट त्या नराधामांना सरकारी पैशांवर पोसलं जातं. काही काळानंतर तिच्यासाठी लावलेल्या मेणबत्त्याही विझतात, आंदोलनं शमतात. आणि कालांतरानं परिस्थिती जैसे थे होते. कोण बलात्कारी कोण निर्भया सगळं संपतं. आणि त्या नराधमाांना काही वेळा तर सोडलं सुद्धा जातं. 

अशा वेळी बलात्कार झालेल्या त्या तरुणीच्या कुटुंबियांनी किती खस्ता खायच्या? किती मागण्या करायच्या? असाच सवाल काही वर्षांपुर्वी क्रुर पद्धतीने गँगरेप झालेल्या निर्भयाच्या आईनं विचारलाय. 

आता काही काळ मागे जाऊयात...

2012 मध्ये दिल्ली सामूहिक बलात्काराची घटना म्हणजे 1 डिसेंबर 2012 रोजी भारताची राजधानी दिल्ली इथं बलात्कार आणि हत्येची घटना घडली होती, जी माध्यमांच्या जलद हस्तक्षेपामुळे उघडकीस आली. मृतदेह दिल्लीला आणण्यात आला आणि पोलिसांच्या संरक्षणाखाली जाळण्यात आला. ट्विटर, फेसबुकवर या कृत्याचा निषेध करत सोशल मीडियावर बरेच काही लिहिले गेले. या घटनेविरोधात झालेल्या निषेधांमुळे देशभरात तीव्र आणि शांततेत निदर्शने झाली, नवी दिल्ली, कलकत्ता आणि बंगळुरू येथे निदर्शने उल्लेखनीय ठरली.

मात्र एवढं सगळं होऊनही काही काळाने हो शांत झालं आणि तिचे आरोपी अजुनही तसेच आहेत. त्यांना कुठालीही शिक्षा झाली नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर यावरून मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या संदर्भात दिल्लीतील निर्भया प्रकरणातील पीडितेच्या आई आशा देवी म्हणाल्या, 'गेल्या सात वर्षांपासून मी संघर्ष करत आहे. मी या देशातील न्याय व्यवस्थेकडे आणि सरकारकडे न्याय देण्याची मागणी करत आहे. निर्भयाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी.' राम सिंह, मुकेशसिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि एक अल्पवनीय आरोपी, असे पाच जण याप्रकरणात आरोपी होते. यातील राम सिंहने 11 मार्च 2013 तिहार कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर इतर चौघांच्या फाशीची प्रतीक्षा आहे.  

निर्भयाची आई काय म्हणते?

हैदराबादमधील पीडितेला लवकर न्याय मिळाला. आरोपींचा खात्मा केल्याचा मला आनंद होत आहे. पोलिसांनी अतिशय योग्य काम केले आहे. पोलिसांवर या प्रकरणाात कोणत्याही प्रकारे कारवाई करू नये, अशी माझी मागणी आहे. 
- आशा देवी, दिल्लीतील निर्भयाची आई

हैदराबाद बलात्कार आणि हत्याप्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आलाय .यावर देशभरातून हैदराबाद पोलिसांच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय .दिल्लीतील बलात्कार-हत्या प्रकरणातील पिडीतेच्या आईनंही पोलिसांचं कौतुक केलंय पण त्याचबरोबर माझ्या मुलीलाही न्याय मिळाला पाहिजे, त्या नराधमांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलीय.

Web Title -  Disha got justice but when Nirbhaya get justuce?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com