किरकोळ वादात मित्राने चक्क चावा घेत तोडला कान

किरकोळ वादात मित्राने चक्क चावा घेत तोडला कान

लातूर - प्रत्येक तासाला सत्ता स्थापनेच्या हालचाली बदलत आहेत. त्यानुषंगाने वरिष्ठ नेत्यांच्या बैठका आणि वेगवेगळी खलबतं होत आहेत. एकमेकांच्या विरोधात लढलेले नेते आता मांडीला-मांडी लावून ही समीकरणे जुळवून आणत आहेत. मात्र, असे असताना स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते किती एकनिष्ठ आहेत, याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. पक्षाच्या विरोधात का बोलतो? म्हणून एका पट्याने थेट मित्राच्या कानालाच चावा घेतला आणि आर्धा कान बाजूला केला. त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा तिढा लवकर सुटणे गरजेचे झाले असल्याचे दिसत आहे.

त्याचं झालं अस की, निलंगा तालुक्यातील इमानवाडी येथे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रत्नाजी नाईकवाडे, शैलेश नाईकवाडे, संदीप शिंदे हे मित्र गप्पा मारत बसले होते. पक्षातील हेवेदावे एवढ्या टोकाला पोहचले की रत्नाजी नाईकवाडे याने तू भाजप पक्षाच्या विरोधात का बोलतो? म्हणत संदीप याच्या कानाला चावा घेतला. यामध्ये संदीपचा अर्धा कानच तुटून निघाला. मग काय सुरू झालेली चर्चा थेट हाणामारीपर्यंत पोहचली. किराणा दुकानालगत असलेल्या जमावाने हे भांडण सोडवले. अखेर याप्रकरणी संदीपचा भाऊ सागरने निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या 20 दिवसांपासून सत्ता स्थापनेची वेगवेगळी समीकरणे समोर येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर विविध अंगाने चर्चा होत आहे. अनेक वेळा नेटकरी हुमरीतुमरीवर येतात. आता नव्याने 'महाशिवआघाडी'ची सत्ता स्थापन होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यामध्येच रत्नाकर हा भाजपचा कार्यकर्ता निघाला आणि पक्षाविरोधात बोलत असलेल्या सागर या मित्राचाच त्याने चावा घेऊन कान तोडला. त्याच्यावर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल हणमंत पडीले करत आहेत.

Web Title: dispute between friends on political situation in Maharashtra

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com