जिल्हा बँकेकडून रब्बीत ३७ टक्के पीककर्ज वितरण

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 मार्च 2020

पुणे - दरवर्षी भेडसावणारी पाणीटंचाई, पावसामुळे होणारे नुकसान, शेती मालाला मिळणारा कमी दर अशा विविध कारणांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. या आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी बँकेकडून कर्ज घेण्याकडे वळू लागला आहे. यंदा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रब्बी हंगामात ४२ हजार १९४ सभासद शेतकऱ्यांना २२७ कोटी ९२ लाख ५६ हजार रुपये म्हणजेच ३७ टक्के पीककर्जाचे वितरण केले असल्याची माहिती बॅंकेच्या सूत्रांनी दिली. 

 

पुणे - दरवर्षी भेडसावणारी पाणीटंचाई, पावसामुळे होणारे नुकसान, शेती मालाला मिळणारा कमी दर अशा विविध कारणांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. या आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी बँकेकडून कर्ज घेण्याकडे वळू लागला आहे. यंदा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रब्बी हंगामात ४२ हजार १९४ सभासद शेतकऱ्यांना २२७ कोटी ९२ लाख ५६ हजार रुपये म्हणजेच ३७ टक्के पीककर्जाचे वितरण केले असल्याची माहिती बॅंकेच्या सूत्रांनी दिली. 

 

गेल्यावर्षी पुणे जिल्हा बॅंकेने रब्बी हंगामात ६५८ कोटी ८५ लाख ९६ हजार रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी ४२ हजार १६७ सभासद शेतकऱ्यांना २३८ कोटी ८२ लाख ५६ हजार रुपये म्हणजेच ३६ टक्के पीककर्जाचे वितरण केले होते. यंदा एका टक्क्याने सुधारणा झाली आहे. 

खरिपात भात, मूग, उडीद, बाजरी, तर रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु, या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन खरीप आणि रब्बी हंगामाचे नियोजन करून पिके घेतात. 

 

पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या २६६ हून अधिक शाखांमार्फत सुमारे १२८२ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना देतात. बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीककर्जाचे वाटप केले जाते. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करतात. खरीप, रब्बी पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भुईमूग अशा अनेक पिकांसाठीही पीककर्जाचे वाटप केले जाते. 

त्यामुळे दरवर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होते. जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, भेर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यात पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. 

नवीन सभासंदाची संख्या वाढली 
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सुमारे दोन लाखांहून अधिक सभासद शेतकरी आहेत. त्यामध्ये दरवर्षी वाढ होत असून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. चालू वर्षी रब्बी हंगामात नव्याने झालेल्या एक हजार १०१ सभासद शेतकऱ्यांनी नव्याने पीककर्ज घेतले आहे. त्यांना सुमारे ६ कोटी ९९ लाख ७४ हजार रुपयांचे पीककर्जाचे वितरण केले आहे. त्यामुळे बँकेने ठेवलेल्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट साध्य करण्यास काही प्रमाणात मदत होत आहे.

 

Web Title: Distribution of rabi 37 percentage crop loan from District Bank


संबंधित बातम्या

Saam TV Live