PUBG खेळतोय नवरा... संसार झाला कावराबावरा...

अश्विनी जाधव केदारी
रविवार, 22 डिसेंबर 2019

तंत्रज्ञान क्रांतीचे फायदे झालेत, तसे तोटेही होतायत. अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असे स्मार्टफोन हातात आलेत आणि त्याचंच व्यसन लागून, नातेसंबंधांना तडे जाऊ लागलेत. पुण्यात तर यावर कळस झालाय. काय झालंय नक्की. पाहु.यात हे सविस्तर विश्लेषण...

तुम्हाला पब्जी खेळायची सवय असेल तर जरा स्वतःला आवरा. कारण पब्जीच्या प्रेमात आकंठ बुडलेल्या नवऱ्याला कंटाळून एका महिलेनं कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केलाय. ही घटना आहे पुण्यातली. या दाम्पत्याला काउन्सेलर्सनी मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवलंय. 
मात्र, केवळ पुण्यातच नव्हे तर सर्वत्रच स्मार्टफोन,इंटरनेट यामुळे नातेसंबंधांवर परिणाम होऊ लागलाय. आपला पार्टनर आपल्याला सोडून सतत स्मार्टफोनवर असतो, याचा राग जोडीदाराच्या मनात दिसून येतोय.
सर्वच वयोगटात स्मार्टफोनचं व्यसन दिसून येतंय. नव्या फोनमध्ये तर तुम्ही किती वेळ स्क्रीन वापरली, तेही दिसतं. असं असूनही त्याचं व्यसन काही दूर होत नाही. त्याचा शेवट नातेसंबंधांना तडे जाण्यात होतोय. त्यामुळे ही घटना पुण्यातली आहे असं समजून दुर्लक्ष करण्यात काहीच अर्थ नाही. हे संकट तुमच्याही दारात उभं आहे, असं समजून आतापासूनच काळजी घ्यायला हवी.

संबंधित बातम्या

Saam TV Live