डी जे मुक्त गणेशोत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल

वृत्तसंस्था
रविवार, 9 सप्टेंबर 2018

आता आवाज वाढवण्यासाठी आईची शपथ नाही तर आईच्या परवानगीची गरज भासणार आहे.. होय.. लातूरमध्ये गणेश मंडळांसोबत पार पडलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जी श्रीकांतं यांनी अशी काही गुगली टाकली की सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजले.. गणेशोत्सवात डीजे हवा असेल तर बिनधास्त लावा मात्र त्यासाठी आई किंवा बहिणीची एनओसी आणा अशी अट जिल्हाधिकाऱ्यानी घातली.

डी जेसाठी कुठल्याही  पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या परवानगीची गरज नाही मात्र आई किंवा बहिणीची परवानगी हवी. आई साधा घरातील टीव्हीचा आवाजही वाढवू देत नाही त्यामुळे डेजेसाठी परवानगी मिळणं कठीणच आहे. हेच लक्षात घेऊन जी श्रीकांत यांनी लातूर जिल्हाला डीजेमुक्त करण्यासाठी चांगलीत युक्ती लढवली.

लातूर मधील गणेश मंडळांना डी जेची परवानगी मिळाली असली तरी गणोशोत्सवात डी जे वाजणार की नाही हे आता समस्त आई वर्गाच्या हातात आई..
 
संबंधित बातम्या

Saam TV Live