खासगी वाहनावर 'पोलिस' असल्यास होणार कारवाई

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 जून 2019

मुंबई : खासगी वाहनावर 'पोलिस' अशी पाटी लावणाऱ्या पोलिसांवर आता कारवाई केली जाणार आहे. मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिस यांना आपल्या खासगी वाहनावर 'पोलिस' अशी पाटी लावता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिला.

खासगी वाहनावर 'पोलिस' पाटी अनेकदा आपण पाहिली असेल. अशी पाटी अनेक वाहनचालकांकडून लावली जाते. मात्र, आता अशी पाटी लावणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिसांना त्यांच्या वाहनावर पोलिसांचा लोगो किंवा 'पोलिस' असे स्टिकर लावता येणार नाही. याबाबतचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

यापुढे नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र मोटार वाहन नियम 2013 च्या कलम 134 प्रमाणे संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात येईल.

Web Title: Do not write police and judge on the car or Bike otherwise penalty will be Charged

संबंधित बातम्या

Saam TV Live