धक्कादायक! तबलिगीमुळे 41 डॉक्टर्स विलगीकरण कक्षात

साम टीव्ही
सोमवार, 6 एप्रिल 2020

 मरकजवरुन आलेल्या रिक्षावाल्याच्या संपर्कात आल्यामुळे 41 डॉक्टरांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलंय. 

पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना घडलीय. मरकजवरुन आलेल्या रिक्षावाल्याच्या संपर्कात आल्यामुळे 41 डॉक्टरांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलंय. 

गेल्या अनेक दिवसांपासून देशात मरकजवरुन आलेल्या तबलिगींमुळेच कोरोना पसरतो आहे, अशा बातम्या येत आहेत आणि त्यातच आणखी एक ही मोठी घटना पुण्यातील पिंपरीमध्ये घडलीय.  

एका अपघातग्रस्त रिक्षाचालकावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्याला ताप आल्याने त्याचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले. यात हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाला. यानंतर या रिक्षाचालकाचं तबलिगी कनेक्शन समोर आलंय.

संपूर्ण बातमीच्या माहितीसाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा...

 


संबंधित बातम्या

Saam TV Live