इटलीमधील कोरोनाबधितांना वाचवणाऱ्या त्या डॉक्टर दाम्पत्याची खरी कहाणी

मोहिनी सोनार
बुधवार, 1 एप्रिल 2020

काही दिवसांपासून एका डॉक्टर दांपत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या डॉक्टर दाम्पत्याची नेमकी कहाणी काय आहे वाचा...

 

बऱ्याच दिवसांपासून इटलीत करोनानं हाहाकार माजवलाय. तिथले पंतप्रधान सुद्धा हताश झालेत. सरकारी आरोग्य यंत्रणा सर्वच खचले आहेत. अशातच अफवांना उत आलाय. गेल्या काही दिवसांपासून एका डॉक्टर दाम्पत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यासोबतच अशी पोस्ट व्हायरल होतेय की, या डॉक्टर दाम्पत्याने कोरोनाने ग्रासलेल्या खूप लोकांचे प्राण वाचवले. मात्र शेवटी त्या दोघांनाही करोना झाला आणि ते पुढच्या अर्धा तासात मारणार आहेत. हे कळल्यावर त्यांनी एकमेकांना कवटाळून जीव सोडला. 

त्यांच्या या कार्याचं खूप कौतुक केलं जातंय. त्या पोस्टला प्रचंड प्रमाणात प्रतिसादही मिळतोय. जो तो आपापल्या सोशल साईट्सवर ही पोस्ट शेयर करतंय. मात्र ती पोस्ट निव्वळ अफवा आहे. म्हणजेच खोटी आहे. 

काय आहे सत्य

सर्वप्रथम हा फोटो स्पेनमधील बर्ट्स इलोना या विमानतळावरील आहे. जे की खूप फेमस आहे. त्यामुळे हा फोटो हॉस्पिटलमधील नाही हे उघड आहे. त्यानंतर 13 मार्च 2020 ला हा फोटो अपलोड केला गेला. आणि हा फोटो एमिलो मोरेनाती या फोटोग्राफरने हा फोटो काढलाय. आणि तसं ट्विट केलं की,

मागील काही काळात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय लोकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. त्यावेळी त्यांनी हा फोटो कॅमेऱ्यात कैद केला. तसं स्पष्ट त्या ट्विट मध्ये दिसतंय. त्यामुळे त्या डॉक्टर दाम्पत्याची खोटी कहाणी बनवून व्हायरल केली जाणारी पोस्ट खोटी आहे. 

पाहा, ते खरं ट्विट

 

Ap या बातमी छाननी करणाऱ्या वेब साईटने याचा तपास लावून ही बातमी शेअर सुद्धा केलीय. 

 

त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावावरून कोणीही खात्री केल्याशिवाय कोणत्याही बातमी किंवा सोशल मीडियावरील पोस्टवर विश्वास ठेऊ नये. 

Web Title - marathi news that doctrot couple reality whos photo is viral on social media


संबंधित बातम्या

Saam TV Live