आता कोरोना रुग्ण शोधण्यासाठी प्रशिक्षित श्वान, तासाला 250 जणांची होणार तपासणी

साम टीव्ही
गुरुवार, 11 जून 2020
  • कोरोना रुग्ण शोधण्यासाठी प्रशिक्षित श्वान
  • संवेदनशील नाकामुळे श्वान शोधू शकणार संशयित रुग्ण
  • तासाला 250 जणांची होणार तपासणी

कोरोना रुग्ण शोधासाठी लवकरच आता श्वानांची मदत घेतली जाणार आहे. संशयित रुग्ण शोधण्यासाठी 
डॉग-स्क्वाड तयार केला जाणार आहे.

कोरोना संशयितांना शोधून काढण्यासाठी लवकरच श्वानांची मदत घेतली जाणार आहे. विमानतळ, टेस्टिंग सेंटरमध्ये श्वानपथकं दिसतील. यापूर्वी काही प्रकारचे कर्करोग, मलेरिया, पार्किन्सन्स विकार खास प्रशिक्षित कुत्र्यांचा वापर करण्यात आलाय. कोरोना रुग्णसंबंधी श्वानांकडू तपासणीचे निकाल इंग्लंड, फ्रान्स, इराण देशांमध्ये अनुकूल आलेत. 

  • वास घेण्याबाबत श्वानांचं नाक माणसापेक्षा १० कोटी पटीनं जास्त संवेदनशील असतं.
  • फ्रान्समध्ये व्यक्तीच्या काखेतील घामाच्या वासाचे नमुने श्वानांना देण्यात आले
  • कोरोना रुग्ण ओळखण्याबाबत श्वानपथकाचे 83 ते 100 % अनुमान खरे ठरले

कोरोना रुग्ण ओळखण्यासाठी इराणमध्ये नुकतच 23 दिवस श्वान प्रशिक्षण घेण्यात आलं. इंग्लंड सरकारनं 4 कोटी 50 लाखांचा निधी कोरोना श्वानपथकासाठी मंजूर केलाय. फ्रान्समध्ये तर कोरोना लॅबमध्ये श्वानांची मदत घेण्यात आलीय. भारतातही या दृष्टीनं प्रयत्न सुरु झालेत. 

रुग्ण जितका लवकर ओळखला, तितका लवकर इलाज शक्य आहे. त्यामुळे लवकरच भारतातही कोरोना रुग्ण ओळखण्यासाठी श्वानांचा वापर होऊ शकतो..
 


संबंधित बातम्या

Saam TV Live