आता फसव्या जाहिराती कलाकारांना पडणार महागात

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई  
सोमवार, 24 जून 2019

अमुक उत्पादन वापरा..
झटपट गोरं व्हा...
तमुक तेल लावा..
भराभर केस वाढवा...

अमुक उत्पादन वापरा..
झटपट गोरं व्हा...
तमुक तेल लावा..
भराभर केस वाढवा...

एक ना अनेक जाहिराती. बरं या जाहिरातींमुळं त्या प्रॉडक्टचा खप वाढतो, आणि सामान्यांच्या खिशाला चाट बसते. या जाहिरातींवर सर्वसामान्य विश्वास ठेवतात ते ही जाहिरात करणाऱ्या कलाकारांमुळं. कलाकारांना भारतात अनन्यसाधारण महत्त्व आहे, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, शाहरुख खान ही त्यातली बडी नावं, आणि यांच्या नावाने जाहीरात केली की सामान्यांना अपिल होतं आणि ते प्रॉडक्ट विकत घेतलं जातं.  आणि याचाच फायदा जाहिरात करणारे घेतात. त्यामुळंच आता अशा फसव्या जाहिराती करणं कलाकारांना महागात पडू शकतं. ग्राहक संरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. त्यामुळं फसव्या जाहिराती करणाऱ्यांवर कारवाईचा मार्ग मोकळा झालाय. तसंच सरकार राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण स्थापन करणार असल्याचंही कळतंय. 

 

ग्राहक संरक्षण कायद्याद्वारे आता जाहिरातींमधून फसवणूक झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा सरकारनं दिलाय. त्यामुळं कलाकारांना देखील एखादी जाहिरात करताना त्याची नीट माहिती काढूनच करावी लागणाराय नाहीतर याचा फटका त्यांना बसणाराय. किमान आता तरी ग्राहकांची फसवणूक होणार नाही अशी खात्री बाळगुया.

 

WebTitle : marathi news doing misleading ads will become headache for celebrities


संबंधित बातम्या

Saam TV Live