पाकची अर्थव्यवस्था ढासळली, एक डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी करन्सी कितीवार गेलीये पाहा

पाकची अर्थव्यवस्था ढासळली, एक डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी करन्सी कितीवार गेलीये पाहा

इस्लामाबाद: पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून, महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली आहे. एक डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 148 वर पोहोचले आहे.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंचे दरही भरमसाठ वाढले आहेत. पाकिस्तानमध्ये महागाईचा दर 9.41 टक्‍क्‍यांवर पोहचला आहे. भाज्या आणि दुधांच्या वाढत्या किंमतीनंतर पेट्रोल-डिझेलचा भार पडतोय. पुढच्या काही दिवसांत हा भार आणखीनच वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीची बैठकीत पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशात मे महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींत 9 रुपये प्रती लिटरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वाढत्या दरानुसार पेट्रोल प्रती लिटर 108 तर डिझेल 132 रुपये प्रती लिटर झाले आहे. रॉकेलच्या किंमतीत 7.46 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

इंधनात दरवाढीनंतर दुधाचे दर गगणाला पोहचले आहेत. दुधाच्या दरात प्रति लिटर 23 रुपयांनी वाढ झाल्यामुळे विविध भागामध्ये नागरिकांना लिटरमागे 120 ते 180 रुपये मोजावे लागत आहेत. इंधनाच्या वाढत्या दरामुळे सर्व सामान्य नागरिकांना वाहने परवडत नाहीत. महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला इंधन दरवाढीचा मोठा फटका बसत आहे.

पाकिस्तान भारताप्रमाणेच खनिज तेल आयात करतो. या व्यापारावर घसरत्या रुपयाचा परिणाम दिसू लागला आहे. रुपयाचे मूल्य सातत्याने कमी होत असल्याने महागाई वाढत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बेलआऊटडील केल्यावर पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली. एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 148 पर्यंत घसरला आहे. पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत झालेल्या करारातील अटी, शर्ती अद्याप समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे व्यावसायिक आणि गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे अनेकांनी गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला बसला आहे. येत्या काही दिवसात पाकिस्तानी रुपया आणखी खाली जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानात महागाईचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर भारतानेही पाकिस्तानला शेतमालाचा पुरवठा बंद केला होता. त्यावेळी पाकिस्तानमध्ये टोमॅटोचे दर 200 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले होते. भारताने पाकिस्तानला टोमॅटोचा पुरवठा बंद केल्याने ही भाववाढ झाली होती.

Web Title: Dollar hits historical high at Rs148 intraday in interbank market pakistan
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com