Corona | डोनाल्ड ट्र्म्प यांचा फेस मास्क वापरणण्यास नकार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 एप्रिल 2020

अमेरिकेत कोरोनानं हाहाकार माजवलाय. त्यातच कोरोनामुळे अनेकांचे जीव गेलेत त्यामुळे योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतानाच अमेरिकेच्या अध्यक्षांनी मास्क वापरण्यास नकार दिलाय. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:ची सुरक्षा ठेवण्यास नकार दिलाय. अमेरिकेत होणाऱ्या कोरोनाच्या थैमानानं त्यांनी बहुदा हा निर्णय घेतलाय. मात्र यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. 

मागील काही काळात ब्रीटनच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समजलं होतं. अशातच ट्रम्प यांचा हा निर्णय कितपत योग्य आहे. याचा अंदाज आपण लावू शकतो. 

यांनी केवळ अमेरिकी प्रशासनाचा नव्हे तर खुद्द आपल्या पत्नीचाही सल्ला आज झिडकारला आहे. `मी फेस मास्क वापरणार नाही' असं त्यांनी पत्रकार परिषदेतच स्पष्ट केलं आहे.

कोरोना संसर्गाने सर्वच जग पछाडले आहे. या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी हात धुण्याचा; तसेच  फेस मास्क वापरण्याचा वैद्यकीय सल्ला दिला आहे. फेस्क मास्क आणि वारंवार हात धुतल्यामुळे कोरोनाला रोखणे शक्य असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. चीनपाठोपाठ युरोप आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सर्वच सरकारे ताकही फुंकून पिऊ लागली आहेत. 

अमेरिका सरकारनेही फेस्क मास्क वापरण्याची सूचना केली आहे. मात्र, हाच सल्ला ट्रम्प यांनी नाकारला आहे. एवढेच नव्हे तर ट्रम्प यांच्या पत्नी मिलेनिया ट्रम्प यांनीही कालच ट्विट करीत `विकेंड  जवळ आलाय. सर्वांनीच सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे फेस्क मास्क वापरावा' असं कळकळीचं आवाहन केलं आहे. परंतु ट्रम्प यांना पत्नीचा सल्लाही मान्य नाही असंच त्यांच्या म्हणण्यावरून दिसतंय.

``कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी माझं प्रशासन लोकांना मास्क वापरण्याचा सल्ला देत आहे. मात्र, मास्क वापरायचा की नाही, हे ज्याने-त्याने ठरवायचे आहे. त्यामुळे मी मास्क वापरणार नाही. व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमधील माझ्या कार्यालयातील रिझोल्यूट टेबल फार सुंदर आहे. इतर देशांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, राजे, युवराज्ञी यांना फेस्क मास्क घालून भेटण्याची कल्पना मी करू शकत नाही. कदाचित माझे मत काही काळानंतर बदलेलही. परंतु, तोपर्यंत कोरोनाची साथ संपलेली असेल, असे मला वाटते,'' असे ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

थोडक्यात, ट्रम्प काही केल्या फेस मास्क घालण्याच्या विचारात नाहीत. त्यांना कुणीही सल्ला दिला तरी ते यावर काही पुनर्विचार करतील, असेही दिसत नाही.


संबंधित बातम्या

Saam TV Live