आयात करात भारताने केलेली वाढ अस्वीकारार्ह- डोनाल्ड ट्रम्प

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 जून 2019

भारताकडून आधीच अमेरिकेतील वस्तूवर जास्त आयात कर लावला जात आहे. त्यातच भारताने पुन्हा एकदा आयात करात वाढ केली आहे. हे अजिबात स्वीकारार्ह नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. जी २० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली. डोनाल्ड ट्रम्प हे ओसाकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल.

अमेरिकेतील वस्तूंवर भारताने लावलेला आयात कर अजिबात स्वीकारार्ह नाही. भारताने हा आयात कर कमी केला पाहिजे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

भारताकडून अमेरिकेतील वस्तूंवर सर्वाधिक आयात कर लावण्यात येतो, अशी टीका अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही केली होती. अमेरिकेत येणाऱ्या भारतीय वस्तूंवरही तसाच जास्तीचा आयात कर लागू करण्याचा विचार करीत आहोत, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही दिला होता.

Web title: Donald Trump says Indias recent tariff hike unacceptable

संबंधित बातम्या

Saam TV Live