विठ्ठलाचरणी देणगी घोटाळा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 जुलै 2019

बातमी देवाच्या दारात झालेल्या घोटाळ्याची. तुम्ही जर विठ्ठलाचरणी देणगी दिली असेल, तर तुमची देणगी विठुराया चरणी पोहचली असेलच, याची काही खात्री नाही. कारण पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात देणगी घोटाळा समोर आलाय. 

देणगी देणाऱ्या भाविकाला मंदिर कर्मचाऱ्यानं 8 वर्ष जुनी पावती दिलीय. हा प्रकार भाविकाच्या लक्षात येताच त्यानं मंदिर समितीकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर मंदिर कर्मचारी सिध्देश्वर घायाळ याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

या भाविकाने आकारशे रुपयांची देणगी दिली होती. मात्र त्याला 100 रुपयांची  8 वर्ष जुन्या देणगी पुस्तकातील पावती देण्यात आली. भाविकाच्या तक्रारीनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासून कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं. यानंतर त्याच्याकडील पावती पुस्तकही जमा करण्यात आलंय. दरम्यान, यामागं मोठं ऱॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येतंय. 

Webtitle : marathi news donation scam in pandharpur viththal rukmini temple 

संबंधित बातम्या

Saam TV Live