राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्री करू नका, अमित शाह - सूत्र 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जून 2019

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्री करू नका, अशा स्पष्ट सूचना राज्याच्या नेतृत्वाला दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

त्याचबरोबर शिवसेनेतील धुसफूस आणि अयारामांना मंत्री केल्यास विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपातील निष्ठांवंतांमध्ये नाराजी पसरण्याच्या शक्‍यतेने मंत्रिमंडळ विस्तारावर अनिश्‍चिततेचे ढग पसरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून (ता.17) सुरू होणार असून, त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले होते.

यासाठी 12, 14, 15 आणि 16 जूनचे मुहूर्त भाजप नेते देत होते. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखेपाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून शिवसेनेते गेलेले जयदत्त क्षीरसागर यांच्यासह अनेक नेत्यांना विस्तारात संधी दिली जाईल, असे भाजप नेते सांगत आहेत. 

असे असताना अमित शाह यांनीच विखे यांना मंत्री करायचे नाही, अशी भूमिका घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. असे झाले तर कॉंग्रेस सोडून भाजपात गेलेल्या नारायण राणे यांच्यासारखी अवस्था विखे यांची होण्याची शक्‍यता आहे. 

दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर यांनाही मंत्री करायला शिवसेना नेत्यांचा विरोध असल्याचे समजते. एकनाथ शिंदे सोडल्यास शिवसेनेचे अन्य कॅबिनेट मंत्री विधान परिषदेचे सदस्य असल्याने पक्षात सुरवातीपासूनच धुसफूस आहे. त्याचबरोबर माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर सहाव्या मजल्यावरील एकमेव मंत्री दालन रिक्‍त होते. त्यात सध्या मंत्रालयीन प्रशासकीय कामकाज सुरू झाल्याने नवीन मंत्र्यांसाठी मंत्रालयात एकही दालन शिल्लक नाही. 

संबंधित बातम्या

Saam TV Live