Facebook वर नंबर शेयर करण पडलं महागात... कसं तुम्हीच पाहा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 डिसेंबर 2019

बाबासाहेब डमाळे सध्या ते नगरच्या सायबर पोलिसांकडे चकरा मारतायत. एका फेसबुकवरच्या मित्रांने त्यांना लुबाडलंय थोडं थोडकं नाही तर तब्बल साडे चार लाखांना आणि याला कारणीभूत ठरलाय फेसबुक प्रोफाईलवर ठेवलेला नंबर. 

मागच्या 10 महिन्यांत राज्यात ऑनलाईन फसवणुकीचे 2,789 गुन्हे नोंदवले गेलेत. राज्यात दिवसाला 10 सायबर गुन्हे दाखल होत असतात. 1 जानेवारी 2015 ते 31 ऑक्टोबर 2019 दरम्यान हाच आकडा 10,139 इतका आहे.

10 महिन्यांत डेबिट आणि क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या 833 तक्रारी दाखल झाल्यात. फेसबूक व्हॉट्सअॅपवरुन फसवणूक झाल्याच्या 549 तक्रारी दाखल झाल्यात. हे आकडे बघता, महाराष्ट्रासमोर सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याचं एक मोठं आव्हान उभं आहे.

नव्या गृहमंत्र्यांना आता हे नवं आव्हान पेलावं लागणार आहे. कारण फेसबूक, व्हॉट्सअॅपर असणाऱ्या अनेकांची कष्टाची कमाई यामुळे धोक्यात आलेय.

संबंधित बातम्या

Saam TV Live