मुंबईकरांची सर्वात मोठी समस्या सुटणार ? डबलडेकर लोकल सुरु करण्याचे निर्देश 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

आजच्या घडीला मुंबईकरांची सर्वात मोठी समस्या काय असं म्हटलं तर ती लोकल प्रवासाची. पिक टाईमला तर मुंबईकरांची अवस्था गुरा - ढोरांसारखी असते.

कितीदा लोकांचे जीव जातात, अपघात घडतात. पण, पर्याय काय तर काहीच नाही. तीच लोकल पकडायची, ऑफीस आणि घर गाठायचं.

हीच लोकल आधी ९ डब्ब्यांची होती, मग ती १२ डब्यांची करण्यात आली, आता तर ही लोकल १५ डब्यांची झालीय, पण तरी समस्या काही सुटली नाही. उलट दिवसेंदिवस ही समस्या रौद्र रुप धारण करतेय. त्यामुळंच डबलडेकर लोकल सुरु करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. 

मेट्रो, कोस्टल रोड या गोष्टींनी गर्दी आटोक्यात येईल, पण ती सुरु होण्यासाठी आणखी काही कालावधी आहे. तोपर्यंत डबलडेकर लोकलचा विचार करायला हरकत नाही.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live