सरकारला नागरिकांचा आवाज ऐकू न जाणे, हे वेगळ्या सत्तेच्या मस्तीचे प्रतीक तर नाही ना? - डॉ. अमोल कोल्हे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

पिंपरी - ‘राज्यात गुन्हेगारी वाढून नागरिकांचा जीव जात आहे, तरीही सरकारला नागरिकांचा आवाज ऐकू न जाणे, हे वेगळ्या सत्तेच्या मस्तीचे प्रतीक तर नाही ना, असे वाटल्याशिवाय राहत नाही,’’ अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरुवारी येथे केली. 

खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी प्रथमच पिंपरी- चिंचवड महापालिकेस भेट दिली. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अन्य अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी बैठक घेऊन शहरातील विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक दत्तात्रेय साने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. 

शहराच्या हद्दीतील रेडझोनच्या प्रश्‍नांची सर्व अंगांची माहिती घेत आहे. लवकरच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करून प्रश्‍न सुटेल, अशी आशा आहे. रेडझोनमध्ये केवळ नव्याने होणाऱ्या बांधकामांना नागरी सुविधा देण्यात येणार नसल्याचे हर्डीकर यांनी स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.

WebTitle : marathi news dr amol kolhe on Maharashtra government and demands of citizens 

संबंधित बातम्या

Saam TV Live