डाॅ. पायल तडवी प्रकरणी पुरोगामी संघटनांचा मंत्री गिरीश महाजनांकडे भरपावसात मोर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 जून 2019

नाशिक : डॉ. पायल तडवी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना जामीन मिळू नये. यासाठी चांगल्या वकिलाची नेमणूक करावी या मागणी साठी शहरातील पुरोगामी संघटनांनी शनिवारी भरपावसात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी मंत्री महाजनांशी चर्चा केल्यावर त्यांनी याबाबत कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. 

नाशिक : डॉ. पायल तडवी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना जामीन मिळू नये. यासाठी चांगल्या वकिलाची नेमणूक करावी या मागणी साठी शहरातील पुरोगामी संघटनांनी शनिवारी भरपावसात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी मंत्री महाजनांशी चर्चा केल्यावर त्यांनी याबाबत कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. 

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणातील संशयित डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर व डॉ. अंकिता खंडेलवाल यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. भविष्यात अशा घटना घडू नयेत, म्हणून जिल्ह्यातील सर्व बहुजन बांधवांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना जाब विचारण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी ते जमलेही होते. मात्र शहर पोलिसांनी महाजन यांच्या कार्यालयावर जाण्यास मनाई केली. त्यामुळे मोर्चा शिवाजी रोड येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत नेऊन त्यानंतर महाजन यांच्याशी शासकीय विश्रामगृहात चर्चा करण्याचा निर्णय झाला. मात्र मोर्चा सुरू होऊन पाच मिनिटे होताच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे मोर्चावरही परिणाम झाला. 

डॉ. डी. एल. कराड, डॉ. हेमलता पाटील, आशा तडवी, राजू देसले, सीताराम ठोंबरे, श्रीधर देशपांडे, विजय राऊत यांच्या शिष्टमंडळाने श्री. महाजन यांना निवेदन देऊन डॉ. तडवी प्रकरणावर सविस्तर चर्चा केली. आरोपींची सनद रद्द करण्यात यावी, रॅगिंग हा फौजदारी गुन्हा ठरवावा, विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, भेदभाव बंद करण्यासाठी परिपूर्ण धोरण आखावे, विद्यापीठ स्तरावर जातिभेदमूलक अन्याय निवारण समिती स्थापन करावी, तडवी प्रकरणाचा खटला जलद न्यायालयात चालवावा, अॅड. उज्ज्वल निकम, अथवा नितीन सातपुते यांची नियुक्ती करावी. विद्यापीठ स्तरावर राज्यघटना व आरक्षण धोरणाबाबत प्रबोधन करावे, अशा मागण्या त्यांनी केल्या. 

या मोर्चात डॉ. भारत कारिया, ऍड. नीलेश सोनवणे, विराज देवांग, अरुण शेजवळ, सचिन पाटील, राजू रायमले, मुक्तेश्‍वर मुनशेट्‌टीवार, राजू शिरसाठ, योगेश कापसे, ज्ञानेश्‍वर काळे, सिंधू शार्दुल, अरविंद चव्हाण, दत्तू तुपे, सविता जाधव, जितेश शार्दुल, नितीन भुजबळ, डॉ. नानासाहेब खरे, अशोक शेंडगे, संगीता कुमावत, शिवदास म्हस्दे, अरुण शेजवळ, शरद कोकाटे, हर्षल पवार सहभागी झाले होते. 


संबंधित बातम्या

Saam TV Live