डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकारणी तिन्ही आरोपी डॉक्टरांना जामीन नाकारला

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकारणी तिन्ही आरोपी डॉक्टरांना जामीन नाकारला

वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगमुळे कंटाळून आत्महत्या करणाऱ्या डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तिन्ही महिला डॉक्टरांना जामीन नाकारला आहे. पायलच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडलेवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. 

या तिघी २० मेपासून तुरुंगात आहेत. २२ मे रोजी बिवायल नायर रुग्णालयातील वसतिगृहात मूळ जळगावची असलेल्या डॉ. पायल तडवीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉ. हेमा, डॉ. भक्ती आणि डॉ. अंकिता या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या वरिष्ठ विद्यार्थिनीनी तिचा वारंवार छळ केला आणि तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले, असा पायलच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. 

Web Title: Dr payal tadvi suicide Mumbai High court rejected all three accused woman doctors bail plea

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com