मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ सुहास पेडणेकर यांची नियुक्ती

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झालीय. रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आलीय. राज्यपाल आणि कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी शुक्रवारी  डॉ पेडणेकर यांना राजभवन येथे बोलावून नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले. डॉ पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत करण्यात आलीय. 

आदित्य ठाकरे यांच्याकडून सुहास पेडणेकर यांचं अभिनंदन

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचं अभिनंदन केलंय. आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. सुहास पेडणेकर जींची निवड झाली. मी त्यांचे अभिनंदन करतो. तसेच मी राज्यपाल महोदयांचे खास आभार मानतो. युवासेनेने केलेल्या आंदोलनानंतर, या आधीच्या कुलगुरूंना हटवण्यात आले होते. नवे नियुक्त कुलगुरू यांच्यावर जबाबदारी मोठी आहे, विद्यापीठाचा भोंगळ कारभार आवरण्याची. चांगल्या कामांसाठी युवासेना त्यांच्या पाठीशी उभी राहील, तसेच विद्यापीठाच्या कारभारावर देखील आमची नजर असणारच! आज जसे कुलगुरू नियुक्त झाले, तसेच लवकरात लवकर Pro VC, Controller of Examination आणि Registrar नेमावे, आणि sub centers चा गोंधळ आवरला जाईल हीच अपेक्षा बाळगतो....

संबंधित बातम्या

Saam TV Live