मराठवाडा, विदर्भातल्या  अत्यल्प पावसामुळे राज्यातील 37% गावांवर दुष्काळाचे सावट.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 मार्च 2018

मराठवाडा, विदर्भातल्या काही भागात झालेल्या अत्यल्प पावसामुळे राज्यातील जवळपास 37 टक्के गावांवर दुष्काळाचे सावट आहे. राज्यातील एकूण 39 हजार 755 गावांपैकी 14 हजार 679 गावांची नोंद दुष्काळग्रस्त गावांमध्ये होऊ शकते. येणाऱ्या काळात संभाव्य टंचाईची परिस्थिती पाहता प्रशासनाने एप्रिल ते जून अखेरपर्यंत टंचाई आराखडा शासनदरबारी सादर केला आहे. राज्यातील पिकांच्या उत्पन्नाची मोजदाद पैसेवारी पद्धतीने केली जाते. गेल्या 10 वर्षांपैकी ही सरासरी 50 टक्क्यांपेक्षा कमी आल्यास, तात्काळ दुष्काळ जाहीर केला जातो.

मराठवाडा, विदर्भातल्या काही भागात झालेल्या अत्यल्प पावसामुळे राज्यातील जवळपास 37 टक्के गावांवर दुष्काळाचे सावट आहे. राज्यातील एकूण 39 हजार 755 गावांपैकी 14 हजार 679 गावांची नोंद दुष्काळग्रस्त गावांमध्ये होऊ शकते. येणाऱ्या काळात संभाव्य टंचाईची परिस्थिती पाहता प्रशासनाने एप्रिल ते जून अखेरपर्यंत टंचाई आराखडा शासनदरबारी सादर केला आहे. राज्यातील पिकांच्या उत्पन्नाची मोजदाद पैसेवारी पद्धतीने केली जाते. गेल्या 10 वर्षांपैकी ही सरासरी 50 टक्क्यांपेक्षा कमी आल्यास, तात्काळ दुष्काळ जाहीर केला जातो. अमरावती विभागातील 90 गावं तर औरंगाबादमधील 42 टक्के गावांमध्ये यंदा 50 टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न झालं आहे. त्यामुळे या गावांचा दुष्काळसदृश्यं गावांमध्ये समावेश होऊ शकतो. याआधी केंद्राने आखून दिलेल्या निर्देशांनुसार गोंदिया जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live