एकच प्याला जिवावर घाला; दारूचा एक पेगही जिवावर बेतू शकतो

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

रोज दारूचा एक पेग पिऊन आम्ही दारूडे नाहीत असं मिरवणाऱ्यांनो ही बातमी तुमच्यासाठी.

एक पेग हा आरोग्यासाठी हितकारक असल्याचं सांगत उजळ माथ्यानं फिरणाऱ्यासाठी ही बातमी आहे .

कारण एकच प्याला तुमच्या जिवावर घाला घालू शकतो. एका आंतरराष्ट्रीय संस्थेनं केलेल्या सर्व्हेक्षणात दारूचा एक प्यालाही आरोग्य़ासाठी घातक असल्याचं म्हटलंय.

दारू प्यायल्यानं शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. त्यामुळं हृदयरोगाचा धोका निर्माण होतो. एक पेग काय किंवा अनेक पेग काय दारू शरिरावर दुष्परिणाम करणार ते करतेच. एकच प्याला म्हणतच दरवर्षी जगात दारू प्यायल्यानं २८ लाख लोकांचा मृत्यू होतो. 

एक पेग पिणाऱ्यांनी दारूला लाईफस्टाईलचा भाग बनवलंय. पण एका एका पेगनं दारू पिणाऱ्याचं आयुष्य दिवसादिवसाने कमी होतंय हे वास्तव विसरून चालणार नाही.

संबंधित बातम्या

Saam TV Live