सावधान! सोशल मीडियावर पाहून काढा पिऊ नका, नाहीतर...

साम टीव्ही
गुरुवार, 23 जुलै 2020
 •  
 • सावधान...सोशल मीडियावर पाहून काढा पिऊ नका
 • कोरोना संकटात बनावट वैद्यांच्या काढ्यांचा धुमाकूळ
 • तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय काढा पिणं ठरेल हानीकारक

कोरोनावर अद्याप लस सापडलेली नाही मात्र रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काढे घेण्याचं प्रमाण वाढलंय. अशातच यू-ट्यूबसह अनेक सोशल मीडिया साईट्सवर बनावट वैद्यांच्या काढ्यांनी धुमाकूळ घातलाय.

कोरोना संकाटत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घराघरात आधार घेतला जातोय तो काढ्यांचा. हे काढे कसे बनवावेत. त्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर करावा याविषयीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतायत. पण जरा थांबा. कारण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले काढे तुमचं आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडवूही शकतात. हे काढे आणि औषधं बनावट असल्याचा दावा महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनकडून करण्यात आलाय. त्यामुळे कोणाताही काढा बनवताना किंवा आयुर्वेद, युनानी औषध घेतांना तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये, असं आवाहन एमसीआयएमकडून नागरिकांना करण्यात आलंय. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं अनेक जण काढ्यांवर भर देतायेत. मात्र सध्याच्या घडीला सोशल मीडियात बोगस वैद्यांचा प्रचंड सुळसुळाट झालाय. त्यामुळे काढे पितांना काळजी घ्या..

काय काळजी घ्याल ?
 

 • सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून काढा बनवू नका. 
 • कुणी व्हिडीओ पाठवले असतील तर त्याची खातरजमा करून घ्या
 • तुमच्या शरीरप्रकृतीला जी गोष्ट मानवत नसेल तर ती घेण्याचा अट्टाहास करू नका 
 • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही काढा घेवू नका.
   
 • फायनल व्हीओ - अलिकडे सातत्यानं काढे प्यायल्याने अनेकांच्या तब्येती बिघडल्याचंही समोर आलंय. त्यामुळे सोशल मीडियातील भोंदू वैद्यांच्या व्हिडीओंना बळी पडू नका..कोरोना संकटात नव्या आजारांना निमंत्रण सध्याच्या घडीला कुणालाच परवडणारं नाही. 
   


संबंधित बातम्या

Saam TV Live