गंभीर घटना! नागपुरात वाहतूक पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

नागपूर :  वाहनावर कारवाई केल्याने संतप्त झालेल्या चालकाने व्हॅनने वाहतूक शाखेच्या हवालदाराला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात हवालदार थोडक्‍यात बचावला. ही थरारक घटना गुरुवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास भांडे प्लॉट चौकात घडली. घटनेनंतर व्हॅन सोडून चालक पसार झाला. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी व्हॅनचालक अरविंद रामजी मेटे (वय 36,रा. जुना बिडीपेठ ) याच्याविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

पोलिस हवालदार सुभाष लांडे असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर सक्करदतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून,त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद हा अवैध प्रवासी वाहतूक करतो. 24 फेब्रुवारीला सुभाष लांडे यांनी त्याच्याविरुद्ध कारवाई करून व्हॅन जप्त केली. त्याला चालान दिले. यावेळी अरविंद याने लांडे यांना पाहूण घेण्याची धमकी दिली. गुरुवारी दुपारी अरविंद याने न्यायालयात दंड जमा केला. पावती दाखवून त्याने व्हॅन सोडविली. त्यानंतर तो सुभाष लांडे यांच्या मागावर होता.

भांडे प्लॉट चौकातील थरारक घटना 
सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास लांडे हे मोटरसायकलने जात होते. त्यांचा मोबाइल वाजला. त्यांनी भांडेप्लॉट चौकात मोटरसायकल उभी केली. ते मोबाइलवर बोलत होते. याचदरम्यान मागून भरधाव व्हॅन चालवून अरविंद याने सुभाष लांडे यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. वेळीच लांडे बाजूला झाले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ते खाली पडले. अरविंद हा घटनास्थळीच व्हॅन सोडून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, सक्करदरा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजिद सिद यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी लांडे यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

Web Title Driver Attempt To Crush Traffic Police In Nagpur

संबंधित बातम्या

Saam TV Live